Sameer Amunekar
मार्च ते जून हा प्रवासासाठी एकदम योग्य काळ असतो. उन्हाळ्याच्या सुट्ट्या, सुटसुटीत वेळ आणि उत्साह यामुळे या काळात फिरण्याची मजा काही औरच असते.
गोवा हे निसर्गरम्य सौंदर्य, समृद्ध इतिहास आणि आनंददायक वातावरणासाठी प्रसिद्ध असून, ते भारतातील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. उन्हाळ्यात गर्दीपासून दूर जाऊन निसर्गाचा मनमुराद आनंद घ्यायचा असेल, तर गोवा नक्की एक्सप्लोर करा.
वाराणसी हे भारतातील सर्वात प्राचीन आणि पवित्र शहरांपैकी एक आहे. हिंदू धर्माच्या धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्रांपैकी हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. गंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे शहर अध्यात्म, संस्कृती आणि इतिहासाने भरलेले आहे.
आग्रा हे भारतातील सर्वात ऐतिहासिक आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. ताजमहाल, भव्य किल्ले आणि समृद्ध मुगल संस्कृती यामुळे आग्रा संपूर्ण जगभर ओळखले जाते.
मथुरा (श्रीकृष्णाची जन्मभूमी) हे भारतातील सर्वात पवित्र धार्मिक स्थळांपैकी एक आहे. येथे भक्ती, संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा यांचा सुरेख मिलाफ पाहायला मिळतो.
कोकणातलं एक शांत, अप्रतिम आणि निसर्गरम्य गाव म्हणजे वेळास गाव, हे रत्नागिरीमध्ये आहे. जर तुम्हाला निसर्गाच्या सान्निध्यात, शांत आणि वेगळ्या प्रवासाचा अनुभव घ्यायचा असेल, तर वेळास तुमच्यासाठी परफेक्ट आहे
शिलाँग हे मेघालय राज्याची राजधानी असून, निसर्गरम्य सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. हिरवीगार पर्वतश्रेणी, सुंदर धबधबे, आल्हाददायक हवामान आणि समृद्ध संस्कृती यामुळे शिलाँगला "पूर्वेकडील स्कॉटलंड" असेही म्हणतात.