Akshata Chhatre
प्रकृतीने दिलेल्या दोन अनमोल कडुलिंबाची पानं आणि तुळस तुमच्या केसांच्या प्रत्येक समस्येवर नैसर्गिकरित्या मात करू शकतात.
हा DIY हेअर सीरम केस गळणे थांबवतो, त्यांना पोषण देतो आणि मजबूत, दाट व चमकदार बनवतो.
हेअर सीरम बनवण्यासाठी आवश्यक सामग्री कडुलिंबाची पानं, तुळशीची पाने, नारळाचे तेल,व्हिटॅमिन ई कॅप्सूल, कोरफड जेल.
कडुलिंबाची पानं आणि तुळशीची पाने प्रथम स्वच्छ धुऊन घ्या. एका पॅनमध्ये थोडे पाणी गरम करा आणि त्यात नीम व तुळशीची पाने टाकून उकळवा.
पाणी अर्धे झाल्यावर ते गाळून घ्या आणि थंड होऊ द्या. आता या थंड झालेल्या पाण्यात नारळाचे तेल, व्हिटॅमिन ई कॅप्सूल (कॅप्सूल कापून आतील तेल काढावे) आणि कोरफड जेल मिसळा.
सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून एक गुळगुळीत पेस्ट तयार करा. ही पेस्ट एका स्वच्छ स्प्रे बॉटलमध्ये किंवा एअरटाइट कंटेनरमध्ये भरून ठेवा.
या सीरमच्या नियमित वापराने तुमचे केस गळणे कमी होईल, कोंडा पूर्णपणे गायब होईल आणि तुमचे केस पूर्वीपेक्षा जास्त मजबूत, दाट आणि चमकदार होतील.