Sameer Amunekar
कांद्याच्या रसामध्ये सल्फर भरपूर प्रमाणात असते. आठवड्यातून २ वेळा टाळूवर लावल्यास केसांची वाढ सुधारते आणि गळती कमी होते.
नारळ तेलात कढीपत्ता उकळवून थंड झाल्यावर केसांच्या मुळांना मसाज करा. यामुळे केस जाड, मजबूत आणि चमकदार होतात.
आवळा व शिकेकाई केसांना नैसर्गिक पोषण देतात. यांचा वापर केल्याने केस जाड होण्यास मदत होते.
अंड्यातील प्रोटीन केसांना ताकद देते. दही मिसळून आठवड्यातून एकदा हा पॅक लावा, केस पातळ होण्याची समस्या कमी होईल.
कोरफड टाळूला थंडावा देतो आणि केसांच्या मुळांना बळकटी देतो. आठवड्यातून २ वेळा वापर फायदेशीर ठरतो.
रात्री मेथी भिजवून सकाळी बारीक वाटून केसांना लावा. केसांची मुळे मजबूत होऊन केस जाड दिसू लागतात.