Sameer Amunekar
आजच्या स्पर्धात्मक युगात भरगच्च पगाराची नोकरी मिळवण्यासाठी केवळ शैक्षणिक पात्रता पुरेशी नसते. उद्योग क्षेत्रात वेगवेगळ्या कौशल्यांची मागणी वाढत आहे. त्यामुळे आपल्याकडे काही कौशल्यं असणं आवश्यक आहे.
तुम्हाला डेटा वाचता यावा, त्यातून महत्त्वाची माहिती काढता यावी, आणि त्याचा वापर व्यवसायात निर्णय घेण्यासाठी करता यावा, हे कौशल्य खूप महत्त्वाचं आहे. Excel, SQL, Python सारख्या साधनांमध्ये प्रावीण्य मिळवल्यास तुम्हाला आयटी, वित्तीय संस्था, मार्केटिंग अशा क्षेत्रांत भरगच्च नोकऱ्या मिळू शकतात.
ंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर वाढत असल्याने डिजिटल मार्केटिंगचे कौशल्य अगदी गरजेचे झाले आहे. SEO, Google Ads, Content Marketing, Social Media Management अशा विषयांमध्ये प्रावीण्य मिळवा, तर तुमच्यासाठी अनेक चांगल्या संधी खुल्या होतील.
प्रोग्रामिंग भाषांमध्ये प्रावीण्य मिळवणे म्हणजे आयटी क्षेत्रात तुमची ताकद वाढवणे. Python, Java, JavaScript सारख्या भाषा शिकून तुम्ही वेब डेव्हलपमेंट, अॅप डेव्हलपमेंट, आणि सॉफ्टवेअर इंजिनियरिंगमध्ये करिअर करू शकता.
सुधारित नियोजन, संघटन आणि वेळेवर काम पूर्ण करण्याचे कौशल्य तुम्हाला मोठ्या कंपन्यांमध्ये महत्त्वाचे मानले जाते. PMP, Agile, Scrum यांसारखे प्रमाणपत्र घेतल्यास तुमचे कौशल्य अधिक ओळखले जाईल.
कोणत्याही संस्थेमध्ये संवाद साधण्याची, चांगले संबंध प्रस्थापित करण्याची आणि प्रभावीपणे आपले विचार मांडण्याची क्षमता अत्यंत गरजेची आहे. या कौशल्यामुळे टीममध्ये काम करणे आणि नेतृत्वगुण विकसित करणे शक्य होते.