Manish Jadhav
उन्हाळ्यात मोठ्याप्रमाणात फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंब्याचे सेवन केले जाते. आंबा आरोग्यासाठीही फायदेशीर मानला जातो.
आंब्यात व्हिटॅमिन ए, सी, फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक साखर भरपूर प्रमाणात असते. मात्र रात्री आंब्याचे सेवन टाळावे.
तज्ज्ञांच्या मते, दिवसा आंबा खाणे फायदेशीर ठरते, परंतु रात्री त्याचे सेवन केल्यास आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
रात्री शरीराची पचन प्रक्रिया मंदावते. त्यामुळे आंब्यासारखे जड आणि गोड फळाचे सेवन केल्यास पचण्यास त्रास होऊ शकतो.
रात्री आंब्याचे सेवन केल्यास रक्तातील साखर अचानक वाढू शकते, विशेषतः मधुमेही रुग्णांसाठी धोकादायक ठरु शकते.
रात्री आंब्याचे सेवन केल्यास शरीराला कॅलरीज बर्न करण्यास वेळ मिळत नाही. अशापरिस्थितीत ते फॅटच्या रुपात शरीरात जमा होऊ शकते, ज्यामुळे वजन वाढण्याचा धोका वाढतो.
झोपण्यापूर्वी आंबा खाल्ल्यास झोपेचा त्रास होऊ शकतो.