Akshata Chhatre
अंडे प्रथिनांचा उत्तम स्रोत असल्याने स्नायूंच्या विकासाला मदत करते. अंड्यामध्ये सर्व आवश्यक अमीनो ऍसिड असतात. एका संशोधनानुसार, रोज एक अंडे खाल्ल्याने लीन स्नायूंचा विकास होतो.
अंडे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढते, हा सामान्य गैरसमज आहे. अलीकडील अभ्यासानुसार, नियमित अंडे खाणे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. अंड्यात कोलीन आणि ओमेगा-३ फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात असते, जे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.
अंड्यात भरपूर प्रमाणात कोलीन असते. हे पोषक तत्व मेंदूचे कार्य, स्मृती आणि मनःस्थितीचे नियमन करण्यासाठी आवश्यक आहे.
कोलीन फोकस वाढवणाऱ्या न्यूरोट्रान्समीटरच्या उत्पादनात मदत करते.
जर तुम्हाला वजन नियंत्रित ठेवायचे असेल, तर अंड्याचा आहारात समावेश करणे उपयुक्त आहे. २००९ च्या एका संशोधनानुसार, नाश्त्यात अंडे खाणारे लोक दिवसभर कमी कॅलरीचे सेवन करतात. यामुळे वजन कमी करण्यास किंवा ते टिकवून ठेवण्यास मदत होते.
अंडे केवळ शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठीच नाही, तर त्वचाआणि केसांसाठीही प्रभावी आहे. अंड्यात असलेले बायोटिन, व्हिटॅमिन डी आणि अमीनो ऍसिड निरोगी त्वचा, केस आणि नखांसाठी आवश्यक आहेत. बायोटिन केसांची वाढ मजबूत करते.
आरोग्य तज्ज्ञांनुसार, सामान्य निरोगी व्यक्ती दिवसातून दोन ते तीन अंडी सुरक्षितपणे खाऊ शकते. लोकांना उच्च कोलेस्ट्रॉल किंवा वजनाची समस्या आहे, त्यांनी दोन ते तीन अंड्यांचा पांढरा भाग आणि केवळ एक पिवळा भाग खाणे योग्य ठरते.