Manish Jadhav
निरोगी जीवनसाठी जसा व्यायम गरजेचा असतो तसाच आहार देखील फार महत्वाचा असतो.
जर आरोग्याच्या काही समस्या सतावत असेल तर काही पदार्थ खाणे टाळे पाहिजे. त्यापैकीच एक काकडी आहे.
आज (8 जुलै) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून रिकाम्या पोटी काकडीचे सेवन का करु नये याबाबत जाणून घेणार आहोत...
रिकाम्या पोटी काकडीचे सेवन केल्यास आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू लागतात.
शरीरातील पित्त, कफ आणि वात दोष संतुलित नसतील, तर तुम्ही कधीच रिकाम्या पोटी काकडीचे सेवन करु नका.
रिकाम्या पोटी काकडीचे सेवन केल्यास अॅसिडिटी होऊ शकते.
काकडीमध्ये फायबर आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे काही लोकांना पोटदुखी किंवा बद्धकोष्ठता होऊ शकते, विशेषतः जर त्यांची पचनशक्ती चांगली नसेल.
काकडीमध्ये ॲमिनो ॲसिड असते, ज्यामुळे काही लोकांना छातीत जळजळ होऊ शकते.