Sameer Panditrao
हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. केळं सहज मिळतं, पोट भरतं… पण सकाळी उठताच खाणं योग्य आहे का?
केळं म्हणजे ऊर्जा! यात पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन B6 भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे थकवा कमी होतो.
रिकाम्या पोटी केळं खाल्लं तर काहींना गॅस, आम्लपित्त किंवा पोट जड वाटू शकतं. विशेषतः संवेदनशील पचन असणाऱ्यांना.
ज्यांची पचनशक्ती चांगली आहे,जे सकाळी व्यायाम करतात किंवा त्वरित ऊर्जा हवी असते, त्यांना केळं चालू शकतं.
आम्लपित्त, गॅस, मायग्रेन किंवा साखरेचा त्रास असणाऱ्यांनी उपाशीपोटी केळं खाणं टाळलेलं बरं.
केळं एकटं न खाता दूध, दही, ओट्स किंवा थोड्या सुक्या मेव्याबरोबर खाल्लं तर पचनाला मदत होते.
उपाशीपोटी केळं सर्वांसाठी वाईट नाही,पण सर्वांसाठी योग्यही नाही.
आपल्या शरीराचा सिग्नल ओळखा आणि त्यानुसार खाण्याची सवय ठेवा.