Manish Jadhav
हाडांच्या मजबूतीसाठी व्हिटॅमिन डी गरजेचे असते. शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता भरुन काढण्यासाठी मासे खाल्ले पाहिजे.
शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता भरुन काढण्यासाठी माश्यांबरोबर अंडी आणि मशरुमचेही आपण सेवन केले पाहिजे.
अंडे हे व्हिटॅमिन डीचा एक चांगला स्रोत देखील आहे. एका अंड्यामध्ये 44 इंटरनॅशनल युनिट्स व्हिटॅमिन डी असते.
शाकाहारी लोकांसाठी मशरुम हे वरदानापेक्षा कमी नाही. यामध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असते.
सॅल्मन, मॅकरेल आणि सार्डिन सारखे फॅटी मासे व्हिटॅमिन डीचे पॉवरहाऊस आहेत. हे तिन्ही व्हिटॅमिन डी आणि ओमेगा-3 फॅटी ॲसिडचे चांगले स्रोत आहेत.