Akshata Chhatre
शरीरातील काही त्रास असे असतात की त्याविषयी बोलणं अवघड वाटतं, पण त्यांचा वेदना मात्र सहन होणे अशक्य असते.
मुळव्याध, फिशर आणि भगंदर हे अशाच गुदमार्गाशी संबंधित आजार आहेत. योग्य वेळी उपचार न केल्यास हे विकार गंभीर रूप धारण करू शकतात.
रोज सकाळी उपाशीपोटी नागदोनची ३ ताजी पानं धुऊन चावून खाणं हे एक सोपं आणि नैसर्गिक औषध आहे.
ही वनस्पती सूज कमी करते, जळजळ शांत करते आणि रक्ताभिसरण सुधारते.
रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत घ्यावे. हे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता टाळते.
दररोज सकाळी उपाशीपोटी एक ग्लास दुधीभोपळ्याचा रस प्यावा. हे पोट थंड ठेवतं आणि गुदमार्गातील सूज कमी करतं. रसात थोडं लिंबू किंवा पुदिनाही घालू शकता.