आठवडाभर काम आणि एक भेट; काय आहे 'वीकेंड मॅरेज'?

Akshata Chhatre

वीकेंड मॅरेज

एखादं नातं टिकवण्यासाठी वेळ देणं, समजून घेणं आणि एकमेकांच्या जवळ असणं या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. मात्र, आजकाल समाजात 'वीकेंड मॅरेज' नावाचा एक वेगळाच ट्रेंड पाहायला मिळतो.

weekend marriage| modern relationship trends | Dainik Gomantak

आठवड्यातून एकदा भेट

या प्रकारात पती-पत्नी एकत्र राहत नाहीत, तर आठवड्यातून फक्त एक-दोन दिवस भेटतात आणि उर्वरित वेळ आपापल्या कामांत व्यग्र असतात.

weekend marriage| modern relationship trends | Dainik Gomantak

वैयक्तिक स्वातंत्र्य

या प्रकारामध्ये एकमेकांसोबत सतत राहण्याऐवजी वैयक्तिक स्वातंत्र्याला अधिक महत्त्व दिलं जातं. अनेकदा करिअरच्या गरजेमुळे पती-पत्नी वेगवेगळ्या शहरांमध्ये असतात.

weekend marriage| modern relationship trends | Dainik Gomantak

पर्याय

यामध्ये प्रेम कमी नसतं, पण एकत्र राहण्याच्या पारंपरिक संकल्पनेला पर्याय म्हणून 'वीकेंड मॅरेज'चा स्वीकार होतो.

weekend marriage| modern relationship trends | Dainik Gomantak

फायदे

दोघांनाही आपल्या आवडी, करिअर आणि व्यक्तिमत्त्वविकासासाठी वेळ मिळतो. सततची जवळीक नसल्यानं वादाचे प्रसंग टाळले जातात.

weekend marriage| modern relationship trends | Dainik Gomantak

अडचणी

घरगुती जबाबदाऱ्या शेअर न केल्यामुळे मुलांच्या संगोपनात अडथळे येऊ शकतात, आर्थिक नियोजन बिघडू शकतं, आणि कौटुंबिक समन्वयात कमतरता जाणवू शकते.

weekend marriage| modern relationship trends | Dainik Gomantak
आणखीन बघा