Manish Jadhav
आवळा व्हिटॅमिन-सीचा उत्तम स्रोत आहे. आवळ्याचे नियमित सेवन रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करते. तसेच, सर्दी-खोकल्यासारख्या आजारांपासून संरक्षण मिळते.
आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. यामुळे बद्धकोष्ठता, ॲसिडिटीसारख्या समस्या दूर होतात आणि पोट साफ राहते.
याशिवाय, केसांच्या आरोग्यासाठीही आवळा खूप फायदेशीर आहे. एक महिना नियमित आवळ्याचे सेवन केल्यास केस गळणे कमी होईल. एवढचं नाहीतर केस अधिक मजबूत, काळे आणि चमकदार बनतील.
तसेच, आवळा त्वचेसाठी एक वरदान आहे. त्याच्या नियमित सेवनाने त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत होते. याशिवाय, रंग उजळतो आणि चेहऱ्यावर एक नैसर्गिक चमक येते.
आवळ्यातील कॅरोटीन डोळ्यांसाठी चांगले असते. रोज आवळा खाल्ल्याने दृष्टी सुधारण्यास मदत होते आणि डोळ्यांशी संबंधित अनेक विकार दूर राहतात.
आवळा एक नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून काम करतो. नियमितपणे आवळा खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि शरीर आतून स्वच्छ होते.
आवळा खाल्ल्याने शरीरातील चयापचय (metabolism) क्रिया देखील वाढते. यामुळे कॅलरी जलद बर्न होते आणि वजन कमी करण्यासाठी त्याचा फायदा होतो.
एक महिना आवळ्याचे सेवन केल्याने शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते. यामुळे दिवसभर थकवा जाणवत नाही आणि कामात नवीन उत्साह कायम राहतो.