Akshata Chhatre
खरा मित्र तुमच्या यशात आनंद मानतो. पण जर तुमची प्रगती पाहून मित्र टोमणे मारत असेल किंवा तुमच्या कामात चुका काढत असेल, तर ती मैत्री नाही.
काही मित्र फक्त मदत हवी असताना किंवा पैसे उधार घेण्यासाठी फोन करतात. काम झाल्यावर जे गायब होतात, अशा 'स्वार्थी' लोकांपासून लांब राहा.
चारचौघात तुमच्या उणिवांवर हसणे आणि विरोध केल्यावर "मी तर गंमत करत होतो" म्हणणे, हे मैत्रीचे लक्षण नसून अपमानाचे लक्षण आहे.
तुम्ही सांगितलेली गुपिते जर तो मित्र इतरांना चवीने सांगत असेल, तर त्याच्यावर पुन्हा कधीही विश्वास ठेवू नका. मैत्रीचा पाया हा विश्वासावर असतो.
सुखाच्या काळात पार्टी करणारे अनेक असतात, पण खरा मित्र तोच जो तुमच्या कठीण काळात, आजारपणात किंवा तणावात खंबीरपणे पाठीशी उभा राहतो.
जर नेहमी तुम्हीच फोन किंवा मेसेज करत असाल आणि समोरून कोणताही प्रतिसाद नसेल, तर समजून जा की ही मैत्री आता फक्त नावालाच उरली आहे.
चुकीच्या मैत्रीमुळे मानसिक शांतता भंग होत असेल, तर ती मैत्री तोडणेच हिताचे असते. लक्षात ठेवा, वाईट मित्रांपेक्षा एकटे राहणे केव्हाही चांगले.