Akshata Chhatre
गुलाब म्हणजे सौंदर्य, सुवास आणि सकारात्मकता. आता तुमच्या घराच्या बाल्कनीतच गुलाबांची सुंदर बाग तयार करा अगदी सहजपणे!
घरच्या घरी बाग फुलवायची असेल तर सगळ्यात आधी बाल्कनीमध्ये सूर्यप्रकाश येणारे ठिकाण निवडा. झाडांना रोज किमान ५-६ तास उन्हाची गरज असते. या बरोबरच वाऱ्याचा वावर असलेले पण सुरक्षित ठिकाण असावे याची काळजी घ्या.
सिमेंट/प्लास्टिक/मातीच्या कुंड्या वापरा. कुंडीत खाली ड्रेनेज होण्यासाठी छिद्र असावे.कुंडीच्या खालचा थर खडीचा ठेवा.
बागायती माती, सेंद्रिय खत आणि थोडी वाळू एकत्र करून खत तयार करा. कंपोस्ट किंवा गांडूळ खत वापरल्यास गुलाब भरभरून फुलतात. मात्र यासाठी माती नेहमी सच्छ व ओलसर ठेवावी.
हायब्रिड टी, मिनी गुलाब, क्लायंबर गुलाब या घरासाठी योग्य ठरतात. मिनी गुलाब कमी जागेत फुलतो त्यामुळे रंग व सुवासानुसार निवड करा.
सकाळी किंवा संध्याकाळीच पाणी द्या. कोरडी पाने आणि वाळलेली फुले वेळीच काढा.
बुरशी किंवा अळ्या दिसल्यास लगेच उपाय करा. झाडे स्वच्छ, खुली आणि सुंदर ठेवा!