Dussehra 2024: दसऱ्याचा आनंद वाढवा, 'या' पदार्थांनी जेवणाचं ताट सजवा

गोमन्तक डिजिटल टीम

विजयादशमी

नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे दसरा किंवा विजयादशमी. रामाने रावणावर मिळवलेल्या विजयाचा दिवस, किंवा देवीने महिषासुराचा वध केलेला विजयाचा दिवस.

आपट्याचं पान

विजयदशमीच्या दिवशी आपट्याच्या पानाला महत्व आहे, असं म्हणतात पांडव अज्ञातवासात गेलेले असताना त्यांनी आपट्याच्या झाडामागे त्यांची शस्त्र लपवून ठेवली होती.

गोड दिवस

दसऱ्याचा दिवस गोड पदार्थांमुळे आणखीन खास बनतो. मग या दिवशी गुलाबजामून, रसमलाई, गाजराचा हलवा असे अनेक पदार्थ बनवता येतात.

गाजराचा हलवा

गाजराचा हलवा हा त्यातल्या त्यात एक सोपा पदार्थ आहे. कमीत कमी वेळात रुचकर पदार्थ बनवायचा असेल तर नक्कीच हलवा बनवू शकता.

गुलाबजामून

गुलाबजामून बनवायच्या विचारात असाल तर घरीच खवा तयार करता येतो किंवा मग रेडिमेड खव्यापासून गुलाबजामून बनवता येतात.

श्रीखंड

घरच्या घरी श्रीखंड बनवायचं असेल तर अगोदरच्या रात्री चक्क तयार करावा लागतो, दुसऱ्या दिवशी त्यात वेलची वैगरे टाकून पदार्थ खुलवता येतो.

आनंद वाटण्याचा दिवस

या दिवशी आपट्याची पानं सोनं म्हणून दिली जातात, सोन्याची खरेदी होते किंवा सकारात्मक गोष्टी विकत घेतल्या जातात. एकंदरच हा दिवस म्हणजे आनंद वाटण्याचा आहे आणि मनापासून आनंदी राहायचं असेल तर पोट कधीही भरलेलं असावं लागतं.

आणखीन बघा