Akshata Chhatre
बागेत सहज सापडणारी दुर्वा म्हणजे फक्त धार्मिक वनस्पती नाही, तर केसांच्या आरोग्यासाठी अनमोल उपाय आहे
महागड्या केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स ऐवजी, हा घरगुती उपाय तुमच्या केसांना करू शकतो जाड, चमकदार आणि निरोगी.
आयुर्वेदात दुर्वेला औषधी वनस्पतींच्या श्रेणीत समाविष्ट केलं गेलं आहे, कारण ती केस गळतीपासून ते स्काल्पच्या समस्यांपर्यंत अनेक अडचणींवर उपाय करू शकते.
दुर्वामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन A आणि C यांसारखी अनेक पोषकद्रव्यंअसतात, जी केसांच्या मुळांना पोषण देतात.
अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म स्काल्पवरील सूज, खाज आणि इतर तक्रारी कमी करतात. ही वनस्पती केसांच्या वृद्धीसाठी उपयुक्त असून, स्काल्पला आवश्यक आर्द्रता पुरवते.