Manish Jadhav
गुजरातच्या सुरत शहरापासून साधारण 18 ते 20 किलोमीटर अंतरावर रहस्यमयी डुमास बीच आहे.
भारतातील इतर समुद्रकिनाऱ्यांसारखी येथे पांढरी किंवा पिवळसर वाळू आढळत नाही. डुमास बीचची वाळू पूर्णपणे काळ्या रंगाची आहे, जी या किनाऱ्याला एक वेगळाच आणि काहीसा रहस्यमय लूक देते.
डुमास बीचची गणना भारतातील सर्वात जास्त 'हॉन्टेड' (बाधित) किंवा रहस्यमय जागांमध्ये केली जाते. सरकारी पातळीवर असे कोणतेही अधिकृत शिक्कामोर्तब नसले, तरी येथील गूढ कथांमुळे हा बीच देशभरात चर्चिला जातो.
इतिहासात या समुद्रकिनाऱ्याचा वापर हिंदू धर्मीयांसाठी 'स्मशानभूमी' म्हणून केला जात होता. असे मानले जाते की, अनेक वर्षांपर्यंत मृतदेहांचे दहन केल्यामुळेच येथील वाळूचा रंग काळा झाला आहे.
दिवसभर पर्यटकांच्या गजबजाटाने फुललेल्या या बीचवर रात्रीच्या वेळी जाण्यास प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव आणि स्थानिक समजुतींमुळे रात्रीच्या वेळी कोणालाही किनाऱ्यावर थांबून दिले जात नाही.
स्थानिक लोक आणि काही धाडसी पर्यटकांच्या दाव्यानुसार, रात्रीच्या वेळी या किनाऱ्यावरुन रडण्याचे, कुजबुजण्याचे किंवा विचित्र ओरडण्याचे आवाज ऐकू येतात. त्यामुळेच रात्रीच्या वेळी हा किनारा पूर्णपणे निर्मनुष्य असतो.
असे म्हटले जाते की, भूतकाळात काही पर्यटकांनी स्थानिक नियमांचे उल्लंघन करुन रात्रीच्या वेळी या किनाऱ्यावर फिरण्याचे धाडस केले होते, ज्यांमधील काही जण गूढरित्या बेपत्ता झाले. या कथांमुळे येथील रहस्य अधिकच गडद झाले.
हा बीच सूर्यास्ताच्या विहंगम दृश्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच, येथे मिळणारे 'टोमॅटो भजी' आणि सुरती स्पेशल 'लॉलीपॉप' (एक स्थानिक खाद्यपदार्थ) खाण्यासाठी खवय्ये येथे मोठी गर्दी करतात.