Goa Rain: गोव्यात पावसाचं 'थैमान'; कुठे दरड कोसळली तर कुठे...

Manish Jadhav

गोव्यात पावसाचा हाहाकार

गोव्यात मागील तीन-चार दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे.

Goa Rain | Dainik Gomntak

चिखलीत स्टेडियमची भिंत कोसळली

मुसळधार पावसामुळे चिखली येथील इनडोअर स्टेडियमची संरक्षित भिंत कोसळली.

Chikhli | Dainik Gomntak

मालपे न्हंयबाग येथे पुन्हा कोसळली दरड!

मालपे न्हंयबाग राष्ट्रीय महामार्ग 66 वर पुन्हा भलीमोठी दरड कोसळल्याने वाहतूक बंद.

malpe National Highway 66 | Dainik Gomntak

मंडूर येथे भिंत कोसळून माय लेक ठार!

राज्यात पावसाचा जोर कायम. मंडूर येथे एका दुर्दैवी घटनेत घराची भिंत कोसळून माय लेक ठार. अग्निशमन दलाच्या जावानांनी ढिगाऱ्याखालून काढले मृतदेह.

Mandur | Dainik Gomntak

सप्तकोटेश्वर मंदिराच्या सोभवताली पाणीच पाणी!

फोंडा तालुक्यातील खांडेपार सप्तकोटेश्वर मंदिराच्या सभोवताली पाणीच पाणी. गेल्या वर्षीसुद्धा या मंदिरात पाणी भरले होते.

Saptakoteshwar temple | Dainik Gomntak

उसगाव ते वाळपाईकडे जाणारा रस्ता खचला

उसगांव ते वाळपई जाणारा रस्ता गावकरवाडा येथे मध्येच खचल्याने रस्ता वाहतुकीस पूर्ण बंद ठेवण्यात आला. दुसऱ्या बाजूने वाहतूक वळवण्यात आली.

usgao road | Dainik Gomntak

धारगळ येथे दरड कोसळली

धारगळ राष्ट्रीय महामार्ग 66 वरील दरड पुन्हा एकदा परत कोसळली,गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणात कोसळली होती,सरळ रेषेत डोंगर कापले जात असल्याने ही स्थिती निर्माण झाली.

Dhargal | Dainik Gomntak