Workout Hydration Tips: 'वर्कआउटदरम्यान पाणी पिणे योग्य की अयोग्य?' डिहायड्रेशन टाळण्याचे सुवर्णनियम!

Manish Jadhav

वर्कआउटदरम्यान पाणी पिणे

व्यायामादरम्यान घामाच्या रुपाने शरीरातील पाणी बाहेर पडते. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होऊन चक्कर येणे किंवा थकवा जाणवणे सुरु होते. हे टाळण्यासाठी व्यायामाच्या मध्ये थोडे-थोडे पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे.

Gym Tips | Dainik Gomantak

एकाच वेळी खूप जास्त पाणी पिणे टाळा!

वर्कआउटदरम्यान घटाघटा खूप जास्त पाणी पिल्याने पोट भरते आणि पोटात जडपणा येतो. यामुळे व्यायाम करताना पोटात दुखणे किंवा मळमळणे अशा समस्या उद्भवू शकतात.

Gym Tips | Dainik Gomantak

पाणी पिण्याची सवय ठेवा!

पाणी पिण्याची योग्य पद्धत म्हणजे दर 10 ते 15 मिनिटांच्या अंतराने फक्त 1 ते 2 घोट पाणी पिणे. यामुळे घसा कोरडा पडत नाही आणि शरीराचे तापमानही नियंत्रित राहते.

Gym Tips | Dainik Gomantak

स्नायूंचे पेटके रोखण्यास मदत!

शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास व्यायामादरम्यान स्नायू जकडून जातात किंवा क्रॅम्प्स येतात. योग्य प्रमाणात पाणी पिल्याने स्नायूंना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होतो आणि दुखापत टळते.

Gym Tips | Dainik Gomantak

थंडगार पाण्याऐवजी 'साधे पाणी' वापरा!

व्यायाम करताना अति-थंड किंवा बर्फाचे पाणी पिणे टाळावे. खूप थंड पाण्यामुळे पोटाचे स्नायू आकुंचन पावू शकतात. त्यामुळे सामान्य किंवा कोमट पाणी पिणे शरीरासाठी सुरक्षित ठरते.

Gym Tips | Dainik Gomantak

1 तासापेक्षा जास्त व्यायामासाठी 'इलेक्ट्रोलाइट्स'!

जर तुम्ही 1 तासापेक्षा जास्त वेळ कडक वर्कआउट किंवा कार्डिओ करत असाल, तर साध्या पाण्याऐवजी पाण्यात थोडे ORS किंवा इलेक्ट्रोलाइट्स टाकून प्यावे. यामुळे घामावाटे गेलेले सोडियम आणि पोटॅशियम भरुन निघते.

Gym Tips | Dainik Gomantak

व्यायामाच्या 'आधी अन् नंतर' पाणी पिण्याचे गणित!

फक्त व्यायामादरम्यानच नव्हे, तर जिम सुरु करण्याच्या 30 मिनिटांआधी 1 ग्लास पाणी प्या आणि वर्कआउट संपल्यानंतर 15-20 मिनिटांनी शरीराचे तापमान सामान्य झाल्यावर पुरेसे पाणी प्या.

Gym Tips | Dainik Gomantak

Battle Of Purandar Fort: 700 मावळ्यांसह मुघलांच्या सैन्यावर तुटून पडले, दिलेरखानाला धडकी भरवली; मुरारबाजीच्या बलिदानाचा थरारक इतिहास

आणखी बघा