Sameer Amunekar
पालकमध्ये व्हिटॅमिन A, C आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे पावसाळ्यात होणाऱ्या सर्दी-खोकल्यापासून संरक्षण करतात.
मसाल्यांमुळे सूप उष्णतादायक बनतो आणि पावसाळ्यात होणाऱ्या पचनाच्या तक्रारी कमी होतात.
पालकातील फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्स शरीरातील विषारी घटक बाहेर टाकायला मदत करतात.
पालकात असलेले कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हाडे आणि दात मजबूत ठेवण्यास उपयुक्त ठरतात.
सूपमध्ये वापरले जाणारे मसाले (जसे आले, लसूण, मिरी) शरीराला उष्णता देतात आणि थकवा दूर करतात.
व्हिटॅमिन C आणि इतर पोषणतत्त्वांमुळे त्वचा निरोगी आणि उजळ बनते – जे पावसाळ्यात खूप महत्त्वाचे आहे.
वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी हा सूप आदर्श आहे, कारण तो कमी कॅलरीचा असून पोषणमूल्यांनी भरलेला असतो.