Akshata Chhatre
त्वचेची नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी बाह्य उपचारांपेक्षा आतून पोषण देणे अधिक महत्त्वाचे आहे.
महागड्या ब्युटी प्रॉडक्ट्सवर पैसे खर्च करण्याऐवजी, तुम्ही कंटेंट क्रिएटर चितवन गर्ग यांनी सांगितलेला 'भेंडीचे पाणी' हा सोपा घरगुती उपाय वापरू शकता.
हे ड्रिंक त्वचेला चमकदार आणि निरोगी बनवतं. हे पाणी बनवण्यासाठी ३-४ भेंडीच्या शेंगा कापून रात्रीभर एका ग्लास पाण्यात भिजवाव्या लागतात.
सकाळी हे पाणी गाळून, त्यात लिंबूचा रस मिसळून उपाशी पोटी प्यायल्यास उत्तम परिणाम मिळतात.
भेंडीच्या पाण्यात अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असल्याने ते कोलेजन उत्पादन वाढवून त्वचेची चमक टिकवून ठेवते.
हे पाणी हायड्रेशन वाढवते आणि सूज कमी करते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भेंडीचे पाणी नैसर्गिक प्रीबायोटिक म्हणून काम करून पोटाचे आरोग्य सुधारते.
पचन चांगले असल्यास त्वचेवर नैसर्गिक निखार येतो आणि रक्त परिसंचरण वाढल्यामुळे त्वचा आपोआप तजेलदार दिसू लागते.