Manish Jadhav
हिवाळ्यात आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवणाऱ्या गोष्टींचे सेवन केले पाहिजे.
आज (7 जानेवारी) आम्ही तुम्हाला सकाळी रिकाम्यापोटी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे, जे तुमचे आरोग्य उत्तम ठेवू शकतात त्याबाबत सांगणार आहोत...
सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही गुळाचा एक तुकडा आणि कोमट पाणी पिऊ शकता. असे केल्यास तुम्हाला ॲनिमियाचा त्रास होणार नाही. एवढचं नाहीतर शरीराला उर्जा आणि लोह मिळते.
सर्दी आणि खोकल्यासारख्या समस्यांपासून तुमचे संरक्षण करण्यातही गूळ उपयुक्त आहे.
थंडीच्या दिवसात सकाळी तुम्ही दालचिनीचा चहादेखील घेऊ शकता, जो आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
परंतु, तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की सकाळी सर्वात आधी साखर किंवा आंबट पदार्थ खाऊ नका, यामुळे गॅस आणि ॲसिडिटीच्या समस्या उद्भवतात.