Akshata Chhatre
तुम्ही दररोज सकाळी लिंबूपाणी प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि पचनक्रिया सुधारते, हे तर सर्वांना ठाऊक आहे.
पण हेच लिंबू केवळ आरोग्यच नव्हे तर घराच्या स्वच्छतेसाठीही एक अद्भुत नैसर्गिक उपाय ठरू शकतो, हे तुम्हाला माहिती आहे का?
वापरलेल्या कटिंग बोर्डवर मीठ शिंपडून त्यावर लिंबाचे तुकडे चोळल्याने त्यावरचे डाग आणि वास निघून जातात.
ओव्हनच्या दारावरील चिकट थर आणि वास दूर करण्यासाठी लिंबाचा रस आणि पाण्याचा स्प्रे करून नंतर स्वच्छ कापडाने पुसल्यास तो नवीनसारखा दिसतो.
काचांवरील पाण्याचे डाग लिंबाच्या रसाने सहज निघतात. लिंबाच्या रसात थोडा बेकिंग सोडा मिसळल्यास हा प्रभाव अधिक वाढतो.
घरातील दुर्गंधी दूर करण्यासाठी लिंबू, लवंगा आणि पाणी उकळून त्याचे स्प्रे बनवून घरात फवारणी केल्यास घरात एक नैसर्गिक फ्रेशनर तयार होतो.