Manish Jadhav
केळी खाल्ल्यानंतर आपण नेहमीच तिची साल फेकून देतो. पण तुम्हाला माहीत आहे का की केळीच्या सालीमध्ये आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी अनेक महत्त्वाचे गुणधर्म दडलेले आहेत.
केळीच्या सालीमध्ये व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन बी12, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि भरपूर प्रमाणात फायबर असते. तसेच, त्यात अनेक अँटी-ऑक्सिडंट्स आणि बायोएक्टिव्ह घटक आढळतात.
केळीच्या सालीमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेसाठी खूप चांगले असतात. सालीच्या आतील बाजूने चेहऱ्यावर घासल्यास मुरुम, काळे डाग आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. यातील मॉइश्चरायझिंग गुणधर्मांमुळे त्वचा मऊ आणि चमकदार होते.
दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी केळीची साल एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे. दररोज सकाळी दात घासल्यानंतर केळीच्या सालीचा आतील भाग दातांवर 2-3 मिनिटे घासल्यास दात नैसर्गिकरित्या पांढरे होण्यास मदत होते.
डोळ्यांना आराम देण्यासाठी केळीची साल उपयुक्त ठरते. डोळ्यांवर थकून आल्यावर किंवा डोळ्यांची आग होत असल्यास केळीच्या सालीचा तुकडा डोळ्यांवर ठेवल्यास आराम मिळतो.
शरीरावर एखादा छोटासा व्रण, फोड किंवा कीटकांच्या चाव्यामुळे होणारी सूज आणि वेदना कमी करण्यासाठी केळीची साल वापरली जाते. सालीचा आतील भाग बाधित जागेवर ठेवल्यास वेदना कमी होतात आणि लवकर आराम मिळतो.
केळीच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. त्यामुळे, बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास किंवा पचनक्रिया मंद असल्यास सुकवलेल्या सालीची पूड गरम पाण्यात मिसळून घेतल्यास फायदा होतो.
चामड्याचे बूट, पिशव्या किंवा इतर वस्तू साफ करण्यासाठी आणि त्यांना चमक देण्यासाठी केळीची साल वापरली जाते. सालीचा आतील भाग चामड्याच्या वस्तूंवर घासल्यास त्या वस्तू पुन्हा नवीन दिसतात.