Manish Jadhav
सकाळच्या वेळी खाल्ले जाणारे पदार्थ आपल्या संपूर्ण दिवसभराच्या आरोग्यावर परिणाम करतात.
आज (2 जानेवारी) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून सकाळच्या वेळी कोणते खाद्य पदार्थ खाणे टाळावे याबाबत जाणून घेणार आहोत.
कॉफीमध्ये कॅफीन असते. रिकाम्या पोटी जर कॉफी पिली तर आपल्याला एसिडीटी होण्याची शक्यता असते. तसेच ब्लड शुगर लेव्हल देखील प्रभावीत होऊ शकते.
सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी गोड पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीरातील साखर वाढू शकते.
फळे आरोग्यासाठी चांगले असते. पण सकाळी रिकाम्या पोटी फळे खाल्ली तर पोटाच्या त जळजळ होऊ शकते.
तळलेले पदार्थांमध्ये फॅट आणि कॅलरी जास्त असते. जी आपल्या पचन यंत्रणेला प्रभावित करते.
दह्यामध्ये प्रोटीन आणि कॅल्शियमचे प्रमाण प्रचंड मोठे असते. पण रिकाम्या पोटी सकाळी दही खाण्याने पोटात एसिडीटी होऊ शकते.