शतक ठोकण्यासाठी ISRO सज्ज, नव्या वर्षात रचणार इतिहास!

Manish Jadhav

इस्त्रो

नवीन वर्षात इतिहास रचण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था आपल्या नव्या मिशनसह सज्ज झाली आहे.

Rocket | Dainik Gomantak

100 वे मिशन

इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी 100 व्या मिशनची घोषणा केली आहे. या मोहिमेला GSLV-F15/NVS-02 असे नाव देण्यात आले आहे. NVS-02 या नावावरुन हे स्पष्ट होते की, हा दुसऱ्या पिढीचा उपग्रह असेल. हे मिशन जानेवारी 2025 मध्ये लॉन्च केले जाईल.

Rocket | Dainik Gomantak

प्रतिक्षा

इस्रोचे हे 100 वे मिशन आहे. मात्र, जानेवारीत कधी लॉन्च होईल याची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. चला तर मग या निमित्ताने, इस्रोच्या या मिशनमधून काय साध्य होणार आहे ते जाणून घेऊया...

Rocket | Dainik Gomantak

GSLV Mk-II रॉकेट

माहितीनुसार, 100 वे मिशन जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल म्हणजेच GSLV Mk-II रॉकेटद्वारे पाठवले जाईल.

Rocket | Dainik Gomantak

उद्देश

भारतीय सॅटेलाइट नेव्हिगेशनचा विस्तार करणे हा या मिशनचा उद्देश आहे. नेव्हिगेशन पेलोडद्वारे वापरकर्त्यांना सिग्नल पाठवले जातात. हे L1, L5 आणि S या तीन बँडच्या स्पेक्ट्रमद्वारे घडते.

Rocket | Dainik Gomantak

GPS NavIC चा भाग

मिशनद्वारे पाठवलेला NVS म्हणजेच नेव्हिगेशन उपग्रह भारतीय GPS NavIC चा एक भाग असेल. ज्याला भारतीय कॉस्टेलेशनसह नेव्हिगेशन म्हणून ओळखले जाते.

Rocket | Dainik Gomantak
आणखी बघा