Manish Jadhav
जांभूळ खाल्ल्यानंतर आपण नेहमी त्याच्या बिया फेकून देतो. पण, तुम्हाला माहीत आहे का की जांभळाच्या गरापेक्षा त्याच्या बियांमध्ये आरोग्यासाठी अधिक फायदेशीर घटक असतात.
जांभळाच्या बियांमध्ये 'जंबोलिन' आणि 'जंबोसिन' हे महत्त्वाचे घटक आढळतात. हे घटक शरीरातून बाहेर पडणाऱ्या साखरेचे प्रमाण नियंत्रित करतात. बियांची पावडर नियमित घेतल्यास रक्तातील साखर कमी होण्यास मदत होते.
जांभळाच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. याची पावडर सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते, गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या कमी होतात.
जांभळाच्या बिया अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी चा उत्तम स्रोत आहेत. बिया रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात, ज्यामुळे शरीर अनेक लहान-मोठ्या आजारांपासून सुरक्षित राहते.
बियांमध्ये असलेल्या पोटॅशियममुळे (Potassium) उच्च रक्तदाब (High Blood Pressure) नियंत्रित ठेवण्यास मदत होते. यामुळे हृदयविकारांचा धोकाही कमी होतो.
जांभळाच्या बियांमध्ये शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याची क्षमता असते. यामुळे शरीराची नैसर्गिकरित्या स्वच्छता होते आणि यकृताचे कार्य सुधारण्यास मदत होते.
काही संशोधनानुसार, जांभळाच्या बियांमध्ये कर्करोगविरोधी (Anti-Cancer) गुणधर्म आढळतात. हे गुणधर्म शरीरातील कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यास मदत करतात.
यात असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म त्वचेशी संबंधित समस्यांवर प्रभावी आहेत. जांभळाच्या बियांची पेस्ट लावल्यास मुरुम (Acne), फोड आणि इतर त्वचेच्या विकारांपासून आराम मिळू शकतो.