दैनिक गोमन्तक
केळी आपल्यापैकी बहुतेकजणांना आवडत असते. मात्र तुम्हाला माहीती आहे का केळीचा आकार वक्र का असतो?
काकडी, शेवगा आणि इतर फळे आणि भाज्यांप्रमाणे केळीचा आकारसुद्धा गुरुत्वाकर्षणामुळे सरळ असायला हवा मात्र तसे दिसत नाही.
सुरुवातीला केळी सरळ असते मात्र जशीजशी त्याची वाढ होत जाईल तसतशे त्यामध्ये बदल दिसतात. सूर्यप्रकाशाच्या दिशेने त्याची वाढ होते आणि त्यामुळे त्याचा आकार वक्र होत जातो. याला Negative Geotropism म्हणतात.
ऑक्सिन केमिकलमुळे केळीला जास्तीत सूर्यप्रकाशाची गरज असते.
त्यामुळे केळीला त्यांचा आगळावेगळा आकार मिळाला.
आरोग्याच्या दृष्टीने केळीचे खूप महत्व आहे. वजन वाढवण्यासाठीदेखील केळी उपयुक्त असल्याचे तज्ञ म्हणतात.
दररोज केळीचे सेवन केल्यामुळे तुमच्या हृदयाचे आरोग्य उत्तम राहते.