गोमन्तक डिजिटल टीम
संध्याकाळी 7 वाजले म्हणजे हमखास टीव्हीवर सिरियल्स सुरु होतात. आई कुठे काय करते? लग्नाची बेडी, पारू, तुला शिकवीन चांगलाच धडा अशा एक ना अनेक.
पण गोव्यात लोकं या सिरियल्स बघत असतील का? त्यांच्या घरात सुद्धा संध्याकाळी सिरियल्स लावायच्या म्हणून भांडणं होत असतील का?
हो!! नक्कीच. गोव्यात मराठी टीव्ही सिरियल्सचा चाहतावर्ग भालामोठा आहे. स्टार प्रवाह असो किंवा झी मराठी संध्याकाळची वेळ म्हणजे टीव्ही सिरियल्स.
घरातील कामं पटापट उरकून इथे सुद्धा बायका मराठी मालिकांचा आनंद घेतात.
एखाद्या मालिकेत कोणावर अन्याय झाला तर इथे देखील चाहत्यांना दुःख होतंच. आज महाएपिसोड आहे असं म्हणून चेहऱ्यावर आश्चर्य पसरतं.
आई कुठे काय करते? ठरलं तर मग! या मालिकांची तर गोव्यात बरीच क्रेझ आहे.
केवळ मराठी मालिकाच नाही तर गोव्यात मराठी चित्रपट सुद्धा पसंत केले जातात.