Sameer Panditrao
सकाळची सुरुवात योग्य झाली तर दिवस छान जातो… पण काही चुका आरोग्यावर परिणाम करतात!
उठताच मोबाईल पाहणे टाळा, यामुळे मेंदूवर ताण येतो आणि दिवसाची ऊर्जा कमी होते .
उठल्या उठल्या पाणी न पिणे ही मोठी चूक आहे, शरीराला हायड्रेशनची गरज असते.
ब्रश न करता काहीही खाणे-पिणे टाळा, यामुळे तोंडातील जंतू वाढू शकतात.
सकाळी शरीर हलवले नाही तर स्नायू कडक राहतात, थोडं स्ट्रेचिंग जरूर करा.
उठल्याबरोबर घाई-गडबड केल्याने मानसिक ताण वाढतो.
या छोट्या सवयी बदलल्यास तुमचा दिवस अधिक ऊर्जा आणि सकारात्मकतेने भरलेला जाईल.