केवळ बाह्य सौंदर्याला भुलू नका; आचार्य चाणक्यांचा पुरुषांना मोलाचा सल्ला

Akshata Chhatre

चाणक्य

केवळ चेहरा सुंदर असून उपयोग नाही. चाणक्यांच्या मते, सौंदर्यापेक्षा स्त्रीच्या बुद्धिमत्तेला आणि समंजसपणाला अधिक महत्त्व दिले पाहिजे.

Chanakya niti for men | Dainik Gomantak

स्त्रीची वाणी

ज्या स्त्रीची वाणी गोड नाही किंवा जिचा स्वभाव रागीट आहे, अशा स्त्रीसोबत संसार करणे कठीण जाते. खराब वागणूक नात्यात कायमची दरी निर्माण करू शकते.

Chanakya niti for men | Dainik Gomantak

बोलणारी व्यक्ती

खोटेपणा हा नात्याचा पाया पोखरणारा कीड आहे. चाणक्य म्हणतात की, वारंवार खोटे बोलणारी व्यक्ती कुटुंबात कधीही विश्वासार्हता निर्माण करू शकत नाही.

Chanakya niti for men | Dainik Gomantak

कौटुंबिक पार्श्वभूमी

लग्नापूर्वी जोडीदाराच्या कौटुंबिक पार्श्वभूमीची माहिती असणे आवश्यक आहे. ज्या घरात नेहमी कलह असतात, त्या वातावरणातील प्रभावामुळे भविष्यात अडचणी येऊ शकतात.

Chanakya niti for men | Dainik Gomantak

चंचल स्वभाव

ज्या स्त्रीचे चारित्र्य संशयास्पद आहे किंवा स्वभाव चंचल आहे, ती कधीही स्थिर संसार करू शकत नाही. अशा नात्यामुळे पतीच्या सन्मानाला धक्का लागू शकतो.

Chanakya niti for men | Dainik Gomantak

जबाबदारीची जाणीव

जुन्या काळात घरकाम येणे ही महत्त्वाची अट होती. आजच्या काळात याचा अर्थ 'जबाबदारीची जाणीव' असा होतो. एकमेकांना मदत करण्याची वृत्ती असणे अत्यंत गरजेचे आहे.

Chanakya niti for men | Dainik Gomantak

दीर्घकालीन सुख

थोडक्यात सांगायचे तर, क्षणिक आकर्षणापेक्षा दीर्घकालीन सुख महत्त्वाचे आहे. चांगला स्वभाव आणि संस्कार असलेली स्त्रीच घराला स्वर्ग बनवू शकते.

Chanakya niti for men | Dainik Gomantak

अक्षय खन्नाची ती हेअरस्टाईल आहे विग; वयाच्या 19व्या वर्षीच का आला 'टक्कल'पणा?

आणखीन बघा