Pramod Yadav
गोव्यात निसर्गसौंदर्य, येथील समुद्रकिनारे, नाईट लाईफचा आस्वाद घेण्यासाठी जगभरातील पर्यटक येत असतात.
याशिवाय विविध ऋतुंमध्ये गोव्याचे बदलते रुप आणि येथील पारंपरिक सण, महोत्सवांचा आनंद घेणं ही देखील एक पर्वणी असते.
पण, गोव्याबाबत अनेक गैरसमज देखील प्रचलित आहेत. अनेक गैरसमज चुकीची माहिती आणि अज्ञातून निर्माण झालेत.
असेच काही प्रचलित समज म्हणजे गोव्यातील न्यूड बीच, रेड लाईट परिसर आणि डान्सबार यांचा समावेश आहे.
पण, गोव्यात अशा काही गोष्टी नाहीत यावर अनेक पर्यटकांचा विश्वास बसत नाही.
हरमल समुद्रकिनाऱ्याची न्यूड बीच निर्माण झालेली ओळख येथे मोठ्या संख्येने भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकांमुळे झाली आहे.
तर, गोव्यात रेड लाईट एरिया अस्तित्वात नाही तर डान्सबारवर कायदेशीर बंदी असून, या बाबी अवैध आणि बेकायदेशीर आहेत.