Korean Glass Skin: मेकअपशिवाय चेहरा चमकेल काचेसारखा! घरातच 5 रुपयांत बनवा कोरियन सीक्रेट आईस क्यूब्स; ग्लो पाहून व्हाल थक्क

Manish Jadhav

इन्स्टंट कोरियन ग्लो!

कोरियन महिलांसारखी टाईट आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी 'ग्रीन टी-काकडी आईस क्यूब्स' उत्तम पर्याय आहे. हा सोपा DIY उपाय उघडे पोर्स बंद करुन चेहऱ्याला लगेच फ्रेश आणि ग्लोइंग लुक देतो.

Skin Care | Dainik Gomantak

मुख्य घटक आणि फायदे

ग्रीन टीमधील अँटी-ऑक्सिडंट्स पिंपल्स आणि रेडनेस कमी करण्यास मदत करतात. काकडीतील भरपूर पाणी त्वचेला डीप हायड्रेशन देऊन काळे डाग हलके करते.

Skin Care | Dainik Gomantak

सोपी कृती

1 कप उकळलेला ग्रीन टी थंड करुन त्यात एका काकडीचा गाळलेला रस मिक्स करा. हे मिश्रण आईस ट्रेमध्ये ओतून 4 ते 5 तास फ्रीझरमध्ये छान सेट व्हायला ठेवा.

Skin Care | Dainik Gomantak

थेट बर्फ चेहऱ्यावर लावणे टाळा!

आईस क्यूब थेट चेहऱ्यावर न घासता नेहमी एका मऊ सुती कापडात गुंडाळून वापरा. स्वच्छ चेहऱ्यावर आणि मानेवर 2 ते 3 मिनिटे हलक्या हाताने वर्तुळाकार मसाज करा.

Skin Care | Dainik Gomantak

ओपन पोर्स लहान होतील!

बर्फाच्या थंडाव्यामुळे चेहऱ्यावरील मोठे उघडे पोर्स लगेच आकुंचन पावतात. यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल निर्मिती थांबते आणि त्वचा गुळगुळीत दिसते.

Skin Care | Dainik Gomantak

अँटी-ॲजिंग आणि पफी आईज

काकडी आणि ग्रीन टीचा थंडावा डोळ्यांखालील सूज आणि काळी वर्तुळे वेगाने कमी करतो. नियमित वापराने चेहऱ्याची लवचिकता वाढून बारीक सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

Skin Care | Dainik Gomantak

मेकअप आधी नक्की ट्राय करा!

रोज सकाळी किंवा मेकअप करण्यापूर्वी 2 मिनिटे हा मसाज केल्यास मेकअप छान सेट होतो. आठवड्यातून 4-5 वेळा हा उपाय केल्यास चेहऱ्यावर नॅचरल लिफ्ट आणि कोरियन ग्लो दिसतो.

Skin Care | Dainik Gomantak

Battle Of Purandar Fort: 700 मावळ्यांसह मुघलांच्या सैन्यावर तुटून पडले, दिलेरखानाला धडकी भरवली; मुरारबाजीच्या बलिदानाचा थरारक इतिहास

आणखी बघा