Travel Destinations: दिवाळीनंतरचा 'लाँग वीकेंड'! नोव्हेंबरमधील सुट्ट्यांमध्ये फिरायला जाण्यासाठी 'टॉप 7' डेस्टिनेशन्स

Sameer Amunekar

गोवा

नोव्हेंबर हा गोवा भेटीचा सर्वात उत्तम काळ असतो. हवामान सुखद असतं, पावसाळा संपलेला असतो आणि गर्दीही नियंत्रित असते. कुटुंबासोबत समुद्रकिनारे, वॉटर स्पोर्ट्स, बोट क्रूझ आणि गोव्यातील सांस्कृतिक फेस्टिव्हल्सचा आनंद घ्या.

Travel Destinations | Dainik Gomantak

महाबळेश्वर

पश्चिम घाटातील हे प्रसिद्ध हिल स्टेशन नोव्हेंबरमध्ये हिरवेगार आणि आल्हाददायक हवामानाने सजलेले असते. व्ह्यूपॉइंट्स, वेण्णा लेक आणि स्ट्रॉबेरी फार्म कुटुंबासाठी परफेक्ट ठिकाणं आहेत.

Travel Destinations | Dainik Gomantak

उटी

"क्वीन ऑफ हिल स्टेशन" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उटीमध्ये या काळात हवामान थंड आणि स्वच्छ असतं. बोटिंग, बोटॅनिकल गार्डन आणि निलगिरी माउंटन ट्रेन हा मुलांसाठी आकर्षण ठरतो.

Travel Destinations | Dainik Gomantak

जयपूर

नोव्हेंबरमध्ये जयपूरला भेट द्या म्हणजे उन्हाची झळ नाही आणि राजेशाही महाल, हवामहल, आमेर किल्ला पाहताना मजा येते. पारंपरिक राजस्थानी जेवण आणि हस्तकलेच्या बाजारात खरेदीची संधी मिळते.

Travel Destinations | Dainik Gomantak

कूर्ग

दक्षिण भारतातील हे रमणीय ठिकाण कुटुंबासाठी आदर्श आहे. धुकट वातावरण, कॉफी प्लांटेशन्स, धबधबे आणि अभयारण्यं. हे सर्व शांततेचा अनुभव देतात.

Travel Destinations | Dainik Gomantak

दार्जिलिंग

नोव्हेंबरमध्ये स्वच्छ आकाशामुळे बर्फाच्छादित कांचनजंगा पर्वताचे अप्रतिम दृश्य दिसते. टॉय ट्रेन राईड आणि मॉल रोडवरील फिरणं ही कुटुंबासाठी खास मजा असते.

Travel Destinations | Dainik Gomantak

आंबोली

आंबोली ठिकाणं कुटुंबासाठी शांत, हिरवळीतलं ठिकाण आहे. येथे बोटिंग, सनसेट पॉइंट लहान मुलांनाही आवडतात.

Travel Destinations | Dainik Gomantak

लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत, प्रत्येकानं करावीत 'ही' आसनं

Yoga | Dainik Gomantak
येथे क्लिक करा