Yoga Tips: तंदुरुस्त राहायचंय? लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत, प्रत्येकानं करावीत 'ही' आसनं

Sameer Amunekar

ताडासन

संपूर्ण शरीराची स्थिती सुधारते आणि पाठीचा कणा मजबूत राहतो. मुलांमध्ये उंची वाढण्यास मदत होते, तसेच वृद्धांमध्ये शरीर संतुलन राखते.

Yoga Tips | Dainik Gomantak

भुजंगासन

हे आसन पाठीचे स्नायू मजबूत करते आणि कंबरदुखी कमी करते. लहान मुलांसाठी योग्य पोश्चर राखण्यात मदत तर वृद्धांसाठी पाठीच्या वेदनांवर लाभदायक.

Yoga Tips | Dainik Gomantak

वज्रासन

जेवणानंतर काही मिनिटं वज्रासनात बसल्याने पचनशक्ती सुधारते. हे सर्व वयोगटांसाठी सर्वात सोपे आणि परिणामकारक आसन आहे.

Yoga Tips | Dainik Gomantak

त्रिकोणासन

शरीरातील ताण कमी करून स्नायू लवचिक ठेवते. मुलांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती वाढवते आणि प्रौढांमध्ये रक्ताभिसरण सुधारते.

Yoga Tips | Dainik Gomantak

अधोमुख श्वानासन

हे आसन शरीरातील रक्तप्रवाह वाढवते, मन शांत ठेवते आणि पाठीचा कणा लवचिक बनवते. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांसाठी उपयुक्त.

Yoga Tips | Dainik Gomantak

पद्मासन

ध्यान आणि श्वसनासाठी सर्वोत्तम आसन. मानसिक ताण कमी करते, एकाग्रता वाढवते आणि वृद्धांना मनशांती प्रदान करते.

Yoga Tips | Dainik Gomantak

शवासन

संपूर्ण शरीर आणि मनाला विश्रांती देणारे आसन. दररोज ५-१० मिनिटं शवासनात राहिल्यास ताणतणाव कमी होतो आणि झोपेची गुणवत्ता सुधारते.

Yoga Tips | Dainik Gomantak

हिवाळ्यातही त्वचा राहील मऊ, 'हे' घरगुती मॉइश्चरायझर वापरा

Winter Skin Care | Dainik Gomantak
येथे क्लिक करा