Sameer Amunekar
दिवाळीतील नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे. या स्नानात उटणे लावण्याला विशेष महत्त्व दिले जाते.
धार्मिक मान्यतेनुसार, नरक चतुर्दशीच्या दिवशी उटणे लावून स्नान केल्याने पवित्रता आणि सकारात्मकतेची अनुभूती मिळते.
उटण्यातील नैसर्गिक घटक त्वचेवरील धूळ आणि मृत पेशी स्वच्छ करण्यास मदत करतात.
बेसन, हळद आणि चंदन यांसारख्या घटकांपासून तयार केलेले उटणे त्वचा मऊ ठेवण्यास मदत करू शकते.
उटण्याचा वापर केल्याने त्वचेवरील अतिरिक्त तेल आणि मळ साफ होण्यास मदत होते. त्यामुळे चेहरा ताजातवाना दिसतो.
उटण्यात वापरल्या जाणाऱ्या चंदन आणि सुगंधी वनस्पतींमुळे स्नानानंतर प्रसन्न आणि ताजेतवाने वाटते.
उटणे लावण्याची परंपरा ही भारतीय संस्कृतीचा भाग आहे. सणाच्या दिवशी स्वच्छता, सौंदर्य आणि प्रसन्नतेचा अनुभव घेण्यासाठी आजही अनेकजण उटण्याचा वापर करतात.