गोमंतक ऑनलाईन टीम
दिवसभरातील धूळ, माती आणि प्रदूषण दूर करण्यासाठी दिवसातून दोन वेळा सौम्य फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवा.
त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी दररोज त्वचेच्या प्रकारानुसार मॉइश्चरायझर लावा.
त्वचेला हायड्रेट आणि तजेलदार ठेवण्यासाठी हायलुरॉनिक अॅसिड किंवा व्हिटॅमिन सीयुक्त सीरम वापरा.
घराबाहेर पडताना SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त सनस्क्रीन वापरा. यामुळे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण होते.
आठवड्यातून एक-दोन वेळा त्वचेच्या प्रकारानुसार हायड्रेटिंग फेस मास्क वापरा.
दिवसभर पुरेसे पाणी प्या. आहारात फळे, हिरव्या भाज्या आणि सुका मेवा यांचा समावेश करा.
दररोज ७ ते ९ तासांची शांत झोप घ्या. पुरेशी झोप त्वचेच्या नैसर्गिक दुरुस्ती प्रक्रियेस मदत करते.