Sameer Amunekar
लागणारे साहित्य
डिंक, गव्हाचे पीठ, तूप, गूळ, सुकामेवा, खसखस, सुके खोबरे आणि वेलची पूड हे साहित्य घ्या.
डिंक तुपात तळून घ्या
कढईत तूप गरम करून त्यात थोडा-थोडा डिंक घाला. डिंक फुलून कुरकुरीत झाल्यावर बाहेर काढा.
गव्हाचे पीठ भाजून घ्या
त्याच कढईत तूप घालून गव्हाचे पीठ मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या.
सुकामेवा भाजून घ्या
बदाम, काजू, खारीक आणि सुके खोबरे बारीक कापून तुपात हलके भाजून घ्या.
डिंकाची पूड तयार करा
भाजलेला डिंक थंड झाल्यावर हाताने किंवा खलबत्त्यात बारीक करून घ्या. त्यात भाजलेला सुकामेवा आणि खसखस मिसळा.
सर्व साहित्य एकत्र करा
भाजलेले गव्हाचे पीठ, डिंक, सुकामेवा आणि वेलची पूड एका मोठ्या भांड्यात एकत्र करा. त्यात किसलेला गूळ घालून चांगले मिसळा.
तयार करा खमंग लाडू
मिश्रण थोडे गरम असतानाच हाताला तूप लावून गोलाकार लाडू वळा. तयार झालेले डिंकाचे लाडू थंड झाल्यावर हवाबंद डब्यात साठवा.