Diwali Skin Care: दिवाळीच्या दिवशी दिसायचंय सुंदर आणि फ्रेश? कच्च्या दुधाचा असा करा वापर, चेहऱ्याची चमक खुलवा

Sameer Amunekar

चेहरा स्वच्छ करा

कच्च्या दुधात कापूस बुडवून हलक्या हाताने चेहरा पुसा. यामुळे चेहऱ्यावरील धूळ आणि घाण स्वच्छ होण्यास मदत होते.

Raw Milk For Face | Dainik Gomantak

दुधाने करा फेस मसाज

थोडे कच्चे दूध घेऊन चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचा मऊ आणि ताजीतवानी वाटते.

Raw Milk For Face | Dainik Gomantak

दूध आणि मधाचा वापर

एक चमचा कच्चे दूध आणि थोडा मध एकत्र करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि काही मिनिटांनी धुवा.

Raw Milk For Face | Dainik Gomantak

दूध आणि बेसन फेसपॅक

कच्च्या दुधात थोडे बेसन मिसळून पेस्ट तयार करा. चेहऱ्यावर लावून वाळल्यानंतर हलक्या हाताने धुवा.

Raw Milk For Face | Dainik Gomantak

दूध आणि हळदीचा लेप

कच्च्या दुधात चिमूटभर हळद मिसळा. हा लेप चेहऱ्यावर लावा आणि काही वेळाने स्वच्छ धुवा.

Raw Milk For Face | Dainik Gomantak

कोरड्या त्वचेसाठी दूध

कच्चे दूध आणि थोडे गुलाबपाणी एकत्र करा. कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेला ताजेतवाने वाटू शकते.

Raw Milk For Face | Dainik Gomantak

चेहऱ्याला द्या मॉइश्चरायझिंग

दुधाचा वापर केल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा आणि त्वचेच्या प्रकारानुसार मॉइश्चरायझर लावा. यामुळे त्वचेतील ओलावा टिकवण्यास मदत होते.

Raw Milk For Face | Dainik Gomantak

दिवाळीत उटणे लावण्यामागे आहे खास रहस्य!

येथे क्लिक करा