Sameer Amunekar
लाडू, चकली, करंजी, शंकरपाळे यांसारखे पदार्थ बनवल्यानंतर ते पूर्ण थंड झाल्यावरच डब्यात भरा. गरम किंवा कोमट अवस्थेत भरल्यास ओलावा तयार होतो आणि पदार्थ लवकर शिळे होतात.
फराळ नेहमी एअरटाइट कंटेनरमध्ये ठेवा. विशेषतः स्टील किंवा काचेचे डबे सर्वोत्तम असतात. प्लास्टिक डब्यांमधून हवा आणि वास पटकन शिरतो.
लाडू, करंजी, अनारसे यांसारखे गोड पदार्थ आणि चकली, शेव, करंजे यांसारखे तिखट पदार्थ वेगळ्या डब्यांत ठेवा, नाहीतर चव आणि सुगंध मिसळतात.
ज्या ठिकाणी फराळ ठेवता ती जागा कोरडी आणि थंड असावी. ओलसर ठिकाणी ठेवल्यास बुरशी किंवा चिकटपणा येऊ शकतो.
फराळाच्या डब्याच्या तळाशी पेपर टॉवेल किंवा बटर पेपर ठेवा. तो ओलावा शोषून घेतो आणि फराळ कुरकुरीत राहतो.
रवा लाडू, बेसन लाडू, नारळ करंजी यांसारखे पदार्थ जास्त दिवस साठवायचे असल्यास फ्रिजमध्ये ठेवू शकता. मात्र खाण्यापूर्वी थोडा वेळ बाहेर ठेवा म्हणजे चव टिकते.
काही दिवसांनी फराळ थोडा शिळा वाटल्यास, हलक्या हाताने तूप किंवा तेलात परतवून घ्या. पुन्हा ताजेपणा आणि कुरकुरीतपणा परत मिळतो.
'लो शुगर' तुमच्या मेंदूवर कसा परिणाम करते?