Diwali Home Cleaning: दिवाळीआधी घर चकाचक करण्यासाठी करा या गोष्टी!

गोमंतक ऑनलाईन टीम

घरातील अनावश्यक वस्तू काढून टाका!

जुन्या आणि न वापरणाऱ्या वस्तू वेगळ्या करा. कपाटे, टेबल आणि शेल्फ आवरल्याने घर अधिक मोकळे व नीटनेटके दिसेल.

Diwali Home Cleaning | Dainik Gomantak

पंखे आणि कोपऱ्यांतील धूळ साफ करा!

पंखे, खिडक्यांचे कोपरे, कपाटांवरील जागा आणि जाळी स्वच्छ करा. वरून खाली साफसफाई केल्यास वेळ वाचेल.

Diwali Home Cleaning | Dainik Gomantak

स्वयंपाकघरातील तेलकट डाग हटवा!

गॅस शेगडी, ओटा, टाइल्स आणि कपाटांचे हँडल स्वच्छ करा. योग्य क्लिनर वापरून चिकटपणा आणि डाग दूर करा.

Diwali Home Cleaning | Dainik Gomantak

खिडक्या आणि आरसे चमकवा!

काचा, आरसे आणि काचेचे टेबल मायक्रोफायबर कापडाने पुसा. स्वच्छ काचांमुळे घर अधिक उजळ दिसेल.

Diwali Home Cleaning | Dainik Gomantak

सोफा आणि पडद्यांची स्वच्छता करा!

सोफ्यावरील धूळ काढा, कुशन कव्हर्स बदला आणि पडदे स्वच्छ करा. यामुळे घराला फ्रेश लुक मिळेल.

Diwali Home Cleaning | Dainik Gomantak

फरशीची करा व्यवस्थित साफसफाई!

संपूर्ण घर झाडून घ्या आणि फरशी पुसा. फर्निचरखालील जागा व कोपरे स्वच्छ करायला विसरू नका.

Diwali Home Cleaning | Dainik Gomantak

शेवटी घराला द्या सणासुदीचा साज!

स्वच्छतेनंतर फुलांचे तोरण, आकर्षक रांगोळी आणि पणत्यांनी घर सजवा. मोजक्या सजावटीच्या वस्तूंनीही घर सुंदर दिसेल.

Diwali Home Cleaning | Dainik Gomantak

निरोगी त्वचेसाठी सकाळपासून रात्रीपर्यंत फॉलो करा हे ७ स्टेप्स!

येथे क्लिक करा