Manish Jadhav
उत्तर गोव्यातील मांडवी नदीत वसलेले दीवार बेट म्हणजे शांतता आणि निसर्गाचा संगम आहे. इथे पोहोचल्यावर तुम्हाला 19व्या शतकातील गोव्याची आठवण येईल.
या बेटावर पोहोचण्यासाठी कोणताही पूल नाही. ओल्ड गोवा किंवा पिळर्ण येथून 'फेरी'ने (Ferry) प्रवास करुनच इथे जाता येते, जो पर्यटकासांठी एक वेगळा अनुभव असतो.
बेटावरील अरुंद रस्ते आणि त्यांच्या दुतर्फा असलेली रंगीबेरंगी पोर्तुगीज धाटणीची घरे फोटोग्राफीसाठी अतिशय सुंदर बॅकड्रॉप तयार करतात.
बेटाच्या सर्वोच्च टेकडीवर वसलेले हे चर्च अतिशय भव्य आहे. येथून संपूर्ण मांडवी नदी आणि आजूबाजूच्या हिरवळीचे विलोभनीय दर्शन घडते.
ऑगस्ट महिन्यात साजरा होणारा ''बोन्देरा'' हा इथला प्रसिद्ध सण आहे. या काळात पूर्ण बेट रंगीबेरंगी परेड आणि संगीताने न्हाऊन निघते.
गर्दीपासून दूर असल्याने इथे अनेक दुर्मिळ पक्षी पाहायला मिळतात. निसर्गप्रेमी आणि सायकलिंग करणाऱ्यांसाठी हे गोवामधील सर्वोत्तम ठिकाण आहे.
या बेटावर ऐतिहासिक सप्तकोटेश्वर मंदिराचे मूळ स्थान होते. हे बेट धार्मिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे मानले जाते.
जर तुम्हाला गोव्यातील गर्दीचा कंटाळा आला असेल, तर दीवार बेट हे एकांतासाठी परफेक्ट आहे. इथे फिरण्यासाठी तुम्ही सायकल किंवा स्कूटर भाड्याने घेऊ शकता.
दीवार बेट फिरण्यासाठी सायकल किंवा स्कूटर भाड्याने घेणे उत्तम ठरते. इथल्या नागमोडी रस्त्यांवरून हिरवळीतून फिरणे हा एक अविस्मरणीय अनुभव आहे.