गोमन्तक डिजिटल टीम
लठ्ठपणा (स्थूलता) ही जगासाठी तसेच भारतासाठी नवी समस्या बनत चालली आहे.
सात कोटी लोक लठ्ठपणाचा सामना करत असल्याची माहिती समोर आली आहे.
पण तुम्हास माहित आहे का लठ्ठपणामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळते ते.
लठ्ठपणामुळे टाइप टू मधुमेह, उच्च रक्तदाब, व्यंधत्व, सांधेदुखी, मणकेदुखी, मूत्राशयाचा त्रास, इन्फेक्शन, कर्करोग, कोलेस्टोरॉलसारख्या इतक्या समस्या उद्भवू शकतात.
व्यायामाचा अभाव, ऑफिसमध्ये एका जागी बसून काम करणे, मानसिक तणाव आणि अपुरी झोप, आहारातील बदल ही लठ्ठपणाची प्रमुख कारणे आहेत.
झोप कमी झाल्यामुळे शरीरातील हार्मोन्सचे असंतुलन होते, ज्यामुळे भूक वाढते आणि शरीरात चरबी साठते.
ऑनलाइन शिक्षण, मैदानी खेळ कमी, फोनचे व्यसन, जंकफूड, अतिउष्मांक - अतिचरबीयुक्तअसलेला आहार, झोपेचे बिघडलेले वेळापत्रक यामुळे विद्यार्थ्यी ,तरुणांचे प्रमाण वाढले.
कमी आत्मविश्वास, नैराश्य, वंध्यत्व, मासिक पाळीच्या समस्या, रक्तस्राव गुंतागुंत हे दुष्परिणाम शरीरावरती स्थूलतेने होतात.
द लॅन्सेट’ या संस्थेने स्थुलतेबाबत अहवाल प्रसिद्ध केला होता त्यामध्ये लठ्ठपणाबाबत विस्तृत माहिती दिलेली आहे.