Sameer Amunekar
गोव्याचं नुसतं निसर्गसौंदर्यच नाही, तर इथली खाद्यसंस्कृतीही तितकीच अनोखी आहे.
गोव्याच्या पदार्थांवर पोर्तुगीज आणि स्थानिक कोकणी संस्कृतीचा प्रभाव आहे. समुद्री खाद्य, तिखट मसाले आणि खास गोड पदार्थ हे गोमंतकीय जेवणाचं वैशिष्ट्य.
मसालेदार नारळाच्या रसात बनलेली पारंपरिक गोवन फिश करी आणि शिंपल्यांच्या रस्स्यासोबत भात अप्रतिम लागतो.
पोर्क विंदालू ही पोर्तुगीज प्रभाव असलेला मसालेदार डिश आहे. एक्साकी हा तिखट-मसालेदार चिकन किंवा मटणाचा खास गोवन प्रकार आहे.
गोव्यात सोलकढी प्रसिध्द आहे. ही नारळ आणि कोकमपासून बनलेले थंडगार पेय असतं. गोव्यात उकडीचे मोदकची प्रसिध्द आहे, मोदक नारळ-गुळाचा गोड पदार्थ आहे.
बेबिंका हा सुप्रसिद्ध पोर्तुगीज-गोवन गोड पदार्थ आहे. हे पिठात पीठ, साखर, तूप , अंड्यातील पिवळ बलक आणि नारळाचे दूध घालून बनवले जाते.