Sameer Amunekar
"काही करू नकोस" असं म्हणण्याऐवजी, "हे असं कर" असं सकारात्मकपणे सांगा. मुलं सकारात्मक शब्दांवर जास्त प्रतिसाद देतात.
घरात छोटे नियम बनवा (जसं की: खेळून झाल्यावर खेळणी ठेवायची). नियम ठराविक असतील, तर मुलं ते सहज पाळतात.
एखादी चुकीची गोष्ट केल्यावर लगेच शिक्षा न करता त्या कृतीचा परिणाम काय होतो, हे समजावून सांगा. उदा. "खेळणी न ठेवल्यामुळे ते तुटू शकतात."
मुलं चुका् करतील तेव्हा ओरडू नका, पण ठामपणे "हे योग्य नाही" असं स्पष्ट सांगा. यामुळे तुम्ही त्यांच्या भावनांचा आदर करता, पण नियमही पाळता.
जेव्हा मुलं चांगली वागतात तेव्हा त्याचं कौतुक करा. "मला खूप आनंद झाला तू तुझी पाटी वेळेवर साफ केलीस!" अशा वाक्यांनी त्यांना प्रोत्साहन मिळतं.
चुक केल्यास मुलांना थोडा वेळ एकटे बसायला सांगायचं, जेणेकरून ते शांत होतील व त्यांच्या कृतीचा विचार करतील.
नियम आणि अपेक्षा कायम ठेवणं महत्त्वाचं. कधी नियम पाळायचे आणि कधी नाही, असं केल्यास मुलं गोंधळतात आणि ऐकणार नाहीत.