Sameer Panditrao
रात्री झोपायच्या आधी कॉफी पिणे तुमच्या शरीरासाठी फायदेशीर नाही.
कॉफीतील कॅफिन मेंदूला सक्रिय ठेवते, ज्यामुळे झोप येत नाही.
नीट झोप न झाल्यामुळे सकाळी थकवा आणि उदासीनता जाणवते.
झोपेपूर्वी कॉफी पिणे हृदयाचे ठोके वाढवू शकते, हृदयावर ताण येतो.
कॅफिन पचनात अडथळा आणते आणि अपचन, अॅसिडिटीची समस्या वाढवते.
झोप न आल्याने मेंदूला आराम मिळत नाही आणि मानसिक ताण वाढतो.
रात्री हर्बल टी किंवा लॅव्हेंडर टी पिणे चांगले, जे तुम्हाला शांत झोप आणते.