Sameer Amunekar
दारू आणि बियर हे दोन्ही लोकप्रिय मद्याचे प्रकार असले तरी त्यामध्ये महत्त्वाचे रासायनिक, प्रक्रिया व गुणधर्मात्मक फरक असतात. चला तर मग या दोन्हीमध्ये असलेल्या फरकांबद्दल जाणून घेऊया.
बियर ही प्रामुख्याने गहू, बार्ली (जव), हॉप्स आणि यीस्टच्या मदतीने तयार केली जाते. यीस्टच्या मदतीने आंबवणी (फर्मेंटेशन) केली जाते, ज्यामुळे अल्कोहोल तयार होते. दारू (उदा. व्हिस्की, रम, वोडका, ब्रँडी) डिस्टिलेशन (गाळणी प्रक्रिया) केली जाते.
साधारणतः बियरमध्ये 4% ते 8% अल्कोहोल असते, काही स्ट्राँग बियरमध्ये 10% पर्यंत असू शकते. दारूमध्ये तुलनेने जास्त प्रमाणात अल्कोहोल असते. व्हिस्की, रम, वोडका यासारख्या मद्यांमध्ये 35% ते 50% अल्कोहोल असते.
बियर ही थोडीशी गोडसर, तसेच थोड्या प्रमाणात कडू चवीची असते. दारूची चव तीव्र असते. काही मद्यांमध्ये लाकडाच्या कडसरपणाची किंवा फळांच्या गोडसर चवीची झलक असते.
बियर थंड सर्व्ह केली जाते आणि थेट बाटलीतूनही पिली जाते. दारू साधारणपणे वेगवेगळ्या कॉकटेलमध्ये वापरली जाते. तसंच थोड्या प्रमाणात ग्लासमध्ये घेतली जाते. काही दारू सोडा, पाणी किंवा मिक्सरसोबत प्यायली जाते.
योग्य प्रमाणात बियर प्यायल्यास ती आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. बियरमध्ये अँटीऑक्सिडंट्स, बी-व्हिटॅमिन्स आणि काही प्रमाणात फायबर असते. मात्र, जास्त प्रमाणात सेवन केल्यास लठ्ठपणा आणि यकृताच्या समस्या उद्भवू शकतात.
काही प्रकारच्या दारूमध्ये हृदयासाठी उपयुक्त घटक असले तरी, जास्त प्रमाणात सेवन केल्यास यकृताचे नुकसान, उच्च रक्तदाब आणि इतर गंभीर आजार होऊ शकतात.