Akshata Chhatre
वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनं पुन्हा एकदा आपल्याला समाजातील कठोर वास्तव दाखवलं आहे. हुंडाबळी, अत्याचार हे केवळ बातम्यांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, ते अजूनही आजूबाजूला घडत आहेत.
"अशा गोष्टी आता कुठं होतात?" ही मानसिकता फेकून देण्याची वेळ आली आहे. समाजात कायदे आहेत, पण जागरूकता आणि मनोवृत्ती बदलणं ही खरी गरज आहे.
मुलींना सुरक्षित ठेवणं महत्त्वाचं आहे, पण त्याहून महत्त्वाचं आहे त्यांना आत्मविश्वास, निर्णयक्षमतेचं आणि स्वतःच्या हक्कांचं भान देणं.
जर मुलगी त्रासाच्या गोष्टी सांगते, तर 'गप्प बस', 'लक्ष देऊ नको' म्हणणं सोडून, तिचं बोलणं ऐका. तिच्यासोबत उभं राहणं हेच खऱ्या अर्थाने पालनपोषण आहे.
शिक्षण हे केवळ पदवी मिळवण्यासाठी नको, तर विचार करण्याची, प्रश्न विचारण्याची आणि स्वतःसाठी उभं राहण्याची ताकद देणारं असावं.
स्त्री सुरक्षिततेचा पाया समाज नाही, तो घर असतो. जर आपण आपल्या मुलींना विचारांची आणि भावनिक सुरक्षिततेची ढाल दिली, तर अशा घटनांना आपण एकत्रितपणे आळा घालू शकतो.