Skin Care Routine: डे क्रीम आणि नाईट क्रीममध्ये नक्की फरक काय? नाईट क्रीम रात्रीच का ठरते जास्त प्रभावी?

Sameer Amunekar

मुख्य उद्देशातील फरक

डे क्रीमचे मुख्य काम दिवसा त्वचेचे ऊन आणि प्रदूषणापासून 'संरक्षण' करणे असते. तर नाईट क्रीम रात्रीच्या वेळी त्वचेची 'दुरुस्ती' (Repair) करण्याचे काम करते.

Skin Care Routine | Dainik Gomantak

घटकांमधील फरक

डे क्रीममध्ये सहसा SPF (सनस्क्रीन) आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. याउलट, नाईट क्रीममध्ये रेटिनॉल, हायड्रोलिक ॲसिड आणि पेप्टाइड्स सारखे हेवी घटक असतात जे त्वचेचे पोषण करतात.

Skin Care Routine | Dainik Gomantak

रात्री त्वचा होते 'रिपेअर मोड'वर

रात्री जेव्हा आपण झोपतो, तेव्हा आपल्या त्वचेच्या पेशींची दुरुस्ती (Cell Renewal) होण्याचा वेग दुप्पट होतो. नाईट क्रीम या प्रक्रियेला अधिक गती देते.

Skin Care Routine | Dainik Gomantak

क्रीमची सुसंगतता

डे क्रीम अतिशय हलकी (Lightweight) आणि तेलकट नसलेली असते, जेणेकरून मेकअप करणे सोपे जाते. नाईट क्रीम मात्र जास्त घट्ट (Thick) आणि अधिक मॉइश्चरायझिंग असते.

Skin Care Routine | Dainik Gomantak

शोषून घेण्याची क्षमता

रात्रीच्या वेळी त्वचेची छिद्रे (Pores) मोकळी असतात आणि त्वचा शांत असते. यामुळे नाईट क्रीममधील पोषक घटक त्वचेमध्ये खोलवर सहज शोषले जातात.

Skin Care Routine | Dainik Gomantak

दिवसा नाईट क्रीम लावण्याचे नुकसान

नाईट क्रीममध्ये असलेले काही घटक (उदा. रेटिनॉल) सूर्याच्या प्रकाशात आल्यास त्वचेवर विपरित परिणाम करू शकतात. यामुळे त्वचा संवेदनशील होऊन काळी पडू शकते.

Skin Care Routine | Dainik Gomantak

अँटी-एजिंगसाठी फायदेशीर

रात्री लावलेली नाईट क्रीम चेहऱ्यावरील सुरकुत्या, फाईन लाईन्स आणि डार्क स्पॉट्स कमी करण्यासाठी जास्त प्रभावी ठरते. म्हणूनच नाईट क्रीम फक्त रात्रीच वापरावी.

Skin Care Routine | Dainik Gomantak

दह्यामध्ये 'या' गोष्टी मिसळून लावा; केस होतील मुळापासून मजबूत, मऊ आणि रेशमी

Hair Care Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा