Manish Jadhav
दिवसाची सुरुवात करण्याची प्रत्येकाची वेगळी पद्धत असते. परंतु आपण स्वत:च्या आरोग्याला चुकीची सवय लावून हानी पोहोचवतो
आज (5 फेब्रुवारी) आम्ही तुम्हाला या वेबस्टोरीच्या माध्यमातून दिवसाची सुरुवात करताना कोणती पेये प्यावीत जेणेकरुन आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील याविषयी सांगणार आहोत.
दिवसाची सुरुवात करण्यासाठी गरम पाण्यात लिंबू मिसळून प्यायल्यास पचनक्रिया सुरळीत चालते.
रोज सकाळी गरम पाण्यात आलं मिसळून प्यायल्याने पोट फुगणे, मळमळ अशा समस्या उद्धभवणार नाहीत.
पुदिन्यामध्ये असणाऱ्या गुणांनी स्नायूंना बळकटी मिळते. अपचनावर उपाय म्हणून गरम पाण्याच पुदिना मिसळून प्यावं.
पाण्यातून कोरफडीचा गर प्यायल्यास आतड्यांमधील हानिकारक घटक शरीराबाहेर पडण्यास मदत होते.
हळदीमध्ये असणारे रोगप्रतिकारक गुणधर्म शरीरास फायदेशीर ठरतात. रोज सकाळी प्यायल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.